पुणे : शरद पवारांनी बाहेरची सून असा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी मधून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. आता याबाबत खुद्द अजित पवारांनीही पलटवार केला आहे. स्वतःला पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता अश्या शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांच्या टिकेचा समाचार घेतला आहे.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या बाहेरची सून या टिकेचा खरपूस समाचार घेतला आहे. स्वतःला तुम्ही पुरोगामी म्हणवता आणि चाळीस वर्षांपासून जी आपल्या घरात सून म्हणून आहे तिला बाहेरची समजता. महिलांबाबत नेमका आपला पाहण्याचा दृष्टिकोन यातून आता स्पष्ट होतो आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी शरद पवार हे वक्तव्य करत होते त्यावेळी आजूबाजूला बसलेली मंडळी खुदु खुदु हसत होती हे चित्र खूप वाईट आहे. हसणाऱ्यांच्या घरातही सुना आहेत आणि हे शब्द त्यांनाही लागू होत आहे ही हसणाऱ्यांसाठी शरमेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू येणे सहाजिकच आहे. आपण पवारांची सून होऊन 40 वर्षे झाले मात्र तरीही आपल्याला बाहेरचे समजले जाते हे ऐकल्यावर कुणालाही गहिवरून येईल असे अजित पवार यांनी शेवटी म्हटले आहे.