‘पोलिस’ विरुद्ध ‘वकिल’ क्रिकेट सामन्यात पहा कुणी मारली ‘बाजी’

दौंड : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दौंड तालुका बार असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये दौंड पोलिसांनी वकील संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले. न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील व पोलीस बांधवांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

येथील दौंड कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत दौंड न्यायालयातील वकिलांचे चार संघ, दौंड व लोहमार्ग न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे दोन संघ, तसेच दौंड पोलीस संघाचा सहभाग होता. दौंड वकिलांचा लॉ फायटर्स व दौंड पोलीस या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये दौंड पोलिसांनी बाजी मारीत विजेतेपद पटकाविले.

संपूर्ण स्पर्धेतील ऑल राऊंडर खेळाडूचा पुरस्कार दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांना देण्यात आला. यावेळी दौंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. गोयल -खेडकर, काळदाते , मुक्कनवार, मोर, कुलकर्णी, दौंड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव,दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, दौंड पोलीस स्टेशनचे अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.