‘पुरंदर’मधील अजितदादांचे आजचे कार्यक्रम ‘रद्द’ झाल्याने उलट सुलट ‘चर्चांना’ उधाण

पुणे / पुरंदर : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत प्रसार माध्यमांमधून उलट सुलट चर्चा होत असताना आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील अजित पवारांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा होणार होता तसेच वडकी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उदघाटन होणार होते. मात्र अजितदादांचे हे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने ते या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत एका अधिकृत वृत्तवाहिनीने या संपूर्ण घडामोडीचा पाठपुरावा केला असून त्यांनी दिलेल्या माहितीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अजितदादा या नियोजित कार्यक्रमांना का उपस्थित राहिले नाहीत किंवा पुढील कार्यक्रमाला का उपस्थित राहणार नाहीत याची माहिती मात्र अजून समोर आली नसून याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.