दौंड : दौंड तालुक्यातील खामगाव येथे एका युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सुरज भुजबळ असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
सुरज भुजबळ हा आपल्या कापड दुकानात बसला होता त्यावेळी अचानक त्याच्या दुकानात मारेकरी घुसले आणि त्याला काही समजण्याच्या आत त्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामुळे सूरज हा जागीच कोसळला. त्याच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.
सूरज भुजबळ याच्यावर हल्ला झाला असून त्यात तो जागीच ठार झाला असल्याचे समजताच गावकरी मोठ्या संख्येने खामगाव येथील चौकात जमले. मारेकऱ्यांना त्वरीत पकडावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. यवत पोलिसांनी कसेबसे जमावाला पांगवले आहे. मात्र जोपर्यंत सूरज चे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत आपण सुरज चा मृतदेहाला हात लावू देणार नाही अशी भूमिका सूरज च्या आईने घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. यवत पोलिसांनी त्यांची समजूत काढून पुढील कारवाई सुरु केली आहे.