कोल्हापूर (सुधीर गोखले) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी सक्त वसुली संचानलायाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे पुत्र व गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ हे सहकार्य करीत नसल्याची तक्रार इडीच्या वकिलांनी न्यायालयात केली. याची दखल घेत न्यायालयाने नावेद यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने दोन दिवसात नाविद ईडीच्या चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इडीने दाखल केलेल्या खटल्यापासून संरक्षण मिळावे म्हणून मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलाने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल प्रलंबित असताना आज न्यायालयानेवरील आदेश दिल्याने मुश्रीफ व त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून ईडी या प्रकरणाचा तपास करीत आहे.
यात नाविद मुश्रीफ यांना यापूर्वीच ईडीने समन्स बजावले होते तरीही ते चौकशीला येत नाहीत, असा दावा आज इडीच्या वकीलांनी न्यायालयात केला. त्यावरून न्यायालयाने या प्रकरणीच्या तपासात नविद यांनी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.