Manipur Viral Video | दोन महिलांवर अनेकांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट

Manipur Viral Video

मणिपूर येथील व्हायरल व्हिडीओ (Manipur Viral Video) समोर आल्यानंतर आता कुठे यंत्रणांना जाग आली असून आता यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अत्याचाराची ही घटना मे महिन्यात घडली असून यामध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली नंतर अनेक पुरुषांनी या दोन पीडित महिलांवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे.

अंगावर काटा आणणारा आणि मानवतेला काळिमा फासणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत येथील आदिवासी संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार या दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरविण्यात आले नंतर त्यांना शेतामध्ये घेऊन जात तेथे अनेक पुरुषांनी या दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला.

त्यानंतर पुन्हा त्या पिडीत महिलांना नग्नावस्थेत रस्त्यावरुन फिरवण्यात आले. ही धक्कादायक घटना मे महिन्यातील असून राजधानी इम्फाळ जवळ असलेल्या कांगपोकपाई जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आयटीएलएफ या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मात्र तेथील पोलिसांनी ही बाब फेटाळली असून ही घटना आपल्या नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यात घडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र अधिक माहिती घेतली असता या प्रकरणाची एफआयआर कांगपोकपाई जिल्ह्यातच दाखल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

कोणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होणार – पंतप्रधान मोदी

मणिपूरमध्ये क्सन महिलांच्या लैंगिक अत्याचाराचा भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना या घटनेचा निषेध केला आहे आणि अत्यंत अमानवीय ही घटना असून यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

गुन्हा दाखल… या प्रकरणामध्ये या महिलांच्या कुटुंबातील काही सदस्यांची हत्या करून नंतर या महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी अपहरण, सामुहिक बलात्कार आणि खूनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

मणिपूरमधील ही घटना व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून बाहेर आल्यानंतर आता सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत असून येथील चिघळलेली परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारने गांभीर्याने हाताळायला अशी मागणीही ट्वीटर हँडल आणि सोशल मिडियावरुन होत आहे.