दौंड : राहू / पिलाणवाडी (ता. दौंड) येथील जून्या पिढीतील आदर्श, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, प्रगतशील शेतकरी दामू भिकू काळे (वय ७५) यांचे १५ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक भाऊसाहेब काळे तसेच राहू (ता.दौंड) येथील दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार, दौंड तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे यांचे ते वडील होते. इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपशिक्षिका, पिलाणवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सीमा संतोष काळे ह्या त्यांच्या सुनबाई आहेत तर डॉ. दत्तात्रेय आनंदा मदने हे त्यांचे नातू होत. दशक्रिया विधी उद्या शनिवार 19 ऑगस्ट रोजी मुळा मुठा नदीतीरी राहू येथे होणार आहे.