good news : दौंड शहरातील सत्ता प्रकार ‘ब’ मिळकतदारांना भुमी अभिलेखचा मोठा दिलासा ! आमदार राहुल कुल यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश



|सहकारनामा|

दौंड : दौंड शहरातील सत्ता प्रकार ‘ब’ या भोगवटा प्रकारात मोडणाऱ्या मिळकतीचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून अनेकांच्या प्रयत्नांनंतरही रेंगाळलेला होता.  

सदरच्या मिळकत दारांनी हा प्रश्न आमदार राहुल कुल यांनी सोडवावा म्हणून मागणी केलेली होती. राहुल कुल यांनी शहरातील अनेक प्रश्नांबरोबरच या प्रश्नाचीही गांभीर्याने दखल घेत भुमी अभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांकडे यासाठी सातत्याने व अत्यावश्यक कागद पत्रा सहित पाठपुरावा केलेला होता त्याला अखेर यश आले आहे.

कुल यांनी नुकतीच भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र गोळे यांची भेट घेतली आणि शहरातील सुमारे दोनशे मिळकत धारकांच्या मिळकतीचे सत्ता प्रकार ब रद्द करण्यात राहुल कुल यांना यश आले. 

त्या संबंधीचे पत्र उपविभागीय प्रांत कार्यालयाद्वारे सदर मिळकत दारांना देण्यात आले असून उर्वरित प्रस्तावांवर ही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.