चौफुला येथे महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून पळणाऱ्या ‘गब्बर ठाकूरला’ पाठलाग करून पकडले

केडगाव (दौंड) : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले आहे. गब्बर ताराचंद ठाकूर असे या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याला आज दौंड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरीपार्धी-चौफुला (ता. दौंड. जि.पुणे) या गावच्या हद्दीत चौफुला ते शिरूरला जाणाऱ्या चौकात फिर्यादी सौ. अनुसया अंबादास ढगे (वय ८३, रा.सापटणे, ता. म्हाडा, जि. सोलापूर) ह्या बसमध्ये चढत असताना आरोपी गब्बर ताराचंद ठाकुर (वय २५ वर्षे मुळ रा. शाहाजाबाद मध्यप्रदेश सध्या रा.उरुळीकांचन जि. पुणे) याने फिर्यादी यांच्या गळयातील ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा दागिना हा जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन जाऊ लागला. यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले.

सदरील कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर, सहाय्यक फौजदार गाडेकर, पोह. सोनवणे, कापरे, विशाल जाधव, भोसले यांनी केली आहे.