दौंड : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान दि. 20/11/2024 रोजी व निकाल दिनांक 23/11/2024 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दि. 15/10/2024 पासून दि. 25/11/2024 पर्यंत संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने नागरिकांनी आदर्श आचार संहितेचे नियम पाळावेत असे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे.
आदर्श आचार संहितेमध्ये हे नियम पाळा – कोणत्याही नागरिकांनी सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार करू नयेत. तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवू नये, फटाके फोडू नये,. रंग, गुलाल उधळू नये. तसेच संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नये असे सांगण्यात आले आहे.
सोशल मीडिया, व्हाट्सअप ग्रुपवर ही काळजी घ्या – व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin ही सेटिंग करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत, जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहा.पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग थोरातयांनी केले आहे.