सद्गुरू चौरंगीनाथ महाराज पालखीचे केडगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या सद्गुरू चौरंगीनाथ महाराज मठातील पालखीचे आज केडगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. गेल्या 79 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

सद्गुरू चौरंगीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा केडगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना केडगाव ग्रामपंचायतच्या वतीने केडगाव स्टेशन येथे या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच, सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी पालखी सोबत केडगावच्या शिवे पर्यंत चालत जाऊन या पालखी सोहळ्याला मार्गस्थ केले.

यावेळी केडगावच्या विद्यमान सरपंच सौ. पुनम गौरव बारवकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, अशोक हंडाळ, रेखाताई राऊत, शैलजा पितळे, रोहीत गजरमल, गौरव बारवकर, महेश मेत्रे, स्वप्निल राऊत,सचिन गायकवाड, ग्रामपंचायत क्लार्क धनाजी हाके, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.