Daund – दौंड नगरपरिषदेकडून प्लास्टिक पिशवी आणि थर्मोकोल मुक्त दौंड रॅलीचे आयोजन



|सहकारनामा|

दौंड :  दौंड नगरपरिषदेकडून माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२1अंतर्गत प्लास्टिकचा वापर करू नका आणि कापडी पिशवी वापरा हा संदेश देण्यासाठी दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती प्रणोती मंगेश चलवादी यांच्या हस्ते शहरातील व्यापारी वर्गाला गांधीगिरीने कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. 



तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे भांडे, चमचे , वाट्या तसेच इतर उत्पादने वापरू नये असा संदेश देण्यात आला.या रॅली चा प्रारंभ येथील महात्मा गांधी चौकामधून करून शहरातील शालीमार चौक, गोपाळवाडी रोड यामार्गे कापडी पिशवी वाटप करून, शहर प्लास्टिक मुक्त करून कापडी पिशवी वापरा असा संदेश देण्यात आला. 



या कार्यक्रमदरम्यान चालताबोलता आणि प्रेमाने प्लास्टिकला पर्यायी आणि पर्यावरण पूरक गोष्टीचा वापर करून माझी वसुंधरा आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.  



रॅलीमध्ये दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती प्रणोती चलवादी, आरोग्य निरीक्षक शाहू पाटील, मुकादम रवि जाधव, शुभम चौकटे,प्रवीण खुडे, नितीन तुपसौंदर्य, विनोद चितारे तसेच सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.