corona update : पुन्हा 9 रुग्णांना कोरोनाची लागण, 8 गावांतील 62 जणांचे अहवाल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील 8 गावांतील 62 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून या 62 जणांपैकी 9 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यातील 8 गावांमध्ये जावजीबुवांची वाडी 1, खुटबाव 2, नांदूर 1, उंडवडी 1, सहजपुर 1, वरवंड 1, केडगाव (नानगाव) 1, आणि पाटस 1 यांचा समावेश आहे. या कोरोना रुग्णांमध्ये 6 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

दौंड तालुक्यातील कोरोनाची स्थिती बिकट बनत चालली असून विविध उपाय योजनेद्वारे ही महामारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न प्रशाकीय यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे.