दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थोड्याफार फरकाने वाढतच आहे. मात्र आता त्याचा वेगही मंदावला असल्याने एक आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
दौंड तालुक्यातील यवत आणि स्वामी चिंचोली या दोन कोविड सेन्टरमधून सुमारे 60 जणांची कोरोना स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. या 60 जणांपैकी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यातील 1 कुरकुंभ येथील 19 वर्षीय युवक असून दुसरे सहजपुर येथील 53 वर्षीय गृहस्थ आहेत. याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरवाडकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली आहे.