उद्या दौंड बंद! ‘ही’ आहे महत्वाची मागणी..

दौंड : मराठी राजभाषा दिनाच्या दिवशीच मराठा क्रांती मोर्चा (दौंड)च्या वतीने दि.28 फेब्रुवारी रोजी दौंड बंद चे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दौंड बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.