दौंड : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आज दि.28 ऑगस्ट रोजी येथील प्रवीण भैय्या परदेशी मित्र मंडळ व स्वर्गीय गणेश(मामा) सावले प्रतिष्ठान च्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते व मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मा. नगरसेवक राजेश जाधव, राजेश गायकवाड, तसेच हरेश ओझा, अशोक जगदाळे, दत्तात्रय सावंत, वैभव टाटिया, सचिन गोलांडे, जावेद सय्यद, क्रीडाशिक्षक माधव बागल आदी मान्यवर उपस्थित होते. आपले एक रक्तदान वाचवेल मोलाचे प्राण….. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 101 रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.
शिबिरास वैजनाथ जाधव, श्यामसुंदर सोनवणे, निखिल स्वामी, संतोष जगताप, दिनेश फराटे, निलेश गायकवाड, निखिल शिंदे,जयंती पोकार,माधव बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.