राज्यसरकारने नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी : आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

राज्यभरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या संचारबंदी दरम्यान केश कर्तनालयांची दुकाने बंद असल्याने राज्यातील नाभिक समाज बांधवांचे उत्पनाचे स्रोत दीर्घकाळ बंद आहेत यातील अनेकजण भाडेतत्वावर व्यवसाय करत असल्याने आर्थिक ताण सोसत आहेत, सलून व ब्युटीपार्लर्स  पूर्णपणे बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली असून एक पत्र त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पाठवले आहे.

कुल यांनी नाभिक समाजाची होणारी आर्थिक पिळवणुकीतुन बाहेर काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली असून त्यांनी याबाबत मुद्दा उपस्थित करताना शासनाने लॉकडाऊनच्या काळात काही सूट देत विविध दुकाने खुली करण्याची परवानगी दिली परंतु त्यामध्ये सलून व ब्युटीपार्लर  वगळण्यात आली असल्याने  हातावर पोट असलेल्या नाभिक समाजबांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे नमूद करत याप्रश्नी सहानुभूतीने विचार करत शासनाद्वारे नाभिक समाजाला आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.