अवघ्या चौदा दिवसांपूर्वी बाळंत झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला नदीच्या काटेरी झुडुपांत. महिलेच्या मृत्यूबाबत तर्क वितर्कांना उधाण, दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील घटना



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

अवघ्या काही दिवसांपूर्वी बाळंत झालेली महिला परवा अचानक बेपत्ता होऊन आज तिचा मृतदेह भीमा नदीपात्रातील काटेरी झुडुपांत आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. दौंड तालुक्यातील टाकळी भीमा येथे ही दुःखद घटना घडली असून या महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? तिने आत्महत्या केली? हे मात्र अजून  समजु शकले नाही. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही महिला गरोदर असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे तपासणीसाठी जात होती नंतर तेथे डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्या महिलेचीही कोरोना तपासणी करण्यात आली होती. तपासणी नंतर या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर तिची ससून रुग्णालयात डिलिव्हरी झाली होती. बुधवारी अचानकपणे ही महिला आपली मुलीला घरातच ठेऊन राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. ग्रामस्थ तिला शोधत असताना तिचा मृतदेह भिमा नदी पात्रातील एका

काटेरी झुडपात आढळून आला. याबाबत या महिलेने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे मात्र मृत्यूचे कारण समजू शकले नसून तिच्या मृत्यूबाबत तर्क वीतर्कांना उधाण आले आहे.