दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील दोन गावांमध्ये पुन्हा चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली आहे.
दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे 2 तर कुरकुंभ येथील 2 असे मिळून चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
एकूण 50 लोकांचे स्वॅब टेस्टसाठी पाठविण्यात आले होते त्या पैकी एकेरीवाडी येथील 18 वर्षांचा युवक तसेच 35 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर कुरकुंभ येथील 43 वर्षीय पुरुष आणि 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.