दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील दहिटने येथील रुग्ण बरा झाल्याची दिलासादायक बातमी समजेपर्यंत दौंड वासीयांना पुन्हा एकदा कोरोनाने धक्का दिला आहे. दौंड शहरामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डांगे यांनी दिली आहे. कोरोना बाधित रुग्णाचा चहाचा व्यवसाय असल्याचे समोर येत आहे त्यामुळे दौंडकरांची चिंता वाढली असून नागरिकांनी कोरोना विरुद्ध अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे. नागरिकांना तसेच व्यावसायिकांनी मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज वापरावे जेणेकरून याचा प्रादुर्भाव वाढणार नाही असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. दौंड उप जिल्हा रुग्णालयात सध्या SRP चे चार जवान कोरोनावर उपचार घेत असल्याचे व कोरोना बाधित रुग्णास पुण्यात उपचार सुरू असल्याचेही डॉ.डांगे यांनी सांगितले