मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अनुपशहरच्या पगोना गावामध्ये झोपेत असलेल्या दोन साधूंची हत्या झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. पगोना गावात असणाऱ्या मंदिरामध्ये हे दोन मृतदेह आढळल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
या हत्येप्रकरणी यूपी पोलिसांनी नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आहे. याबाबत उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
तर शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी आता या प्रकरणावर ट्विट करत या घटनेला पालघर सारखा धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी याबाबत आपल्या ट्विटमध्ये या घटनेचा उल्लेख करताना
‛अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदितयनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील असे आवाहन केले आहे.
twit Sanjay Raut यामुळे पुन्हा एकदा साधूंच्या हत्येवरून राजकीय घमासानही सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.