लासलगाव : (सहकारनामा ऑनलाइन)
लासलगाव बसस्थानकात घडलेल्या जळीत कांडातील महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. जळीत कांडात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेचा मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू
असताना शनिवारी पहाटे तिने पीडितेने अखेरचा श्वास घेतला आहे. आठवडाभर मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर तिच्या मृत्यूने संपली आहे.
या जळीतकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. १५ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकात सायंकाळी ५:३० च्या दरम्यान प्रेमप्रकरणातील वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते असे तिचे म्हणने होते. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली होती. ही महिला लासलगाव बसस्थानकात उभी असताना तेथे आरोपी रामेश्वर आला होता. यावेळी त्यांच्यात भांडणझाले. यावेळी रामेश्वरने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर शिंपडले आणि पेटवून दिले. बसस्थानकातील प्रवाशांनी आणि एसटी
कर्मचाऱ्यांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत
महिला ६७ टक्के भाजली होती.जखमी आवस्थेत तिला प्रथम लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती आणखी बिघडल्याने तातडीच्या उपचारासाठी तिला मुंबई येथे पाठवण्यात आले. मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे अखेर तिचा मृत्यू झाला.