बारामती : सहकारनामा ऑनलाईन.
KiranaaHomeDelivery या app मुळे आता बारामती शहरातील नागरिकांची किराणा मालाबाबत आता मोठी अडचण दूर झाली होती मात्र तरीही भाजी आणि दूध खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर पडावे लागत होते ही बाब लक्षात घेता या app वर आता दूध आणि भाजीपाला देखील ऑनलाईन सुरू करण्यात येत असल्याची माहिती बारामती क्राईमब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्या यासाठी KiranaaHomeDelivery हे app सुरू करण्यात आले होते. या app ला मोठा प्रतिसाद लाभत असून यावर बारामती शहरातून किराणा साहित्य व्यवस्थित रित्या ऑर्डर करता येत आहे. ते साहित्य दुकानदार बारामती मधील नागरिकांना घरपोच करत आहेत. हे app यशस्वी होत असल्याने आता भाजीपाला आणि दूध सुद्धा KiranaHomeDelivery या app मार्फत ऑनलाइन पद्धतीने मागविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी KiranaaHomeDelivery हे app आपल्या फोन मध्ये install करून भाजीपाला, दूध तसेच किराणा साहित्य ऑर्डर करावे. संबंधित दुकानदारांकडून काही समस्या असल्यास app मधील उपलब्ध दुकानदाराचे फोन वर कॉल करावा.
अधिक समस्या असल्यास खलील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही यादव यांनी केले आहे.
Swapnil Ahivale
8805029138
Vishal Javale
8605802424
Sandip Jadhav
9881604141
Surendra Wagh
9022373713
Pi Chandrashekhar Yadav
9923630652