धुळे : सोशल मिडियावर एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांच्यावर कलम 354 A, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कलम 67,67 A अश्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत महाराष्ट्र टाईम्स (मटा) ने अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेमंत पाटील हे धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक होते. त्यांच्यावर मध्यरात्री उशिरा देवपूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग धुळे चे ते तत्कालीन पोलीस निरीक्षक होते. त्यानंतर त्यांची धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि नंतर काही दिवसांपूर्वीच त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.