दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या उदघाट्नाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच व्यापीठावर एकत्र येणार का म्हणून ज्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तो कार्यक्रम आज रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पवार कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी यावेळी आपल्याला जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना व्यासपीठावर एकत्र पाहून राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मात्र हायसे वाटत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितल्या लहानपणीच्या आठवणी… अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल च्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळून आपल्या परिवारातील लहानपनीच्या आठवणींना उजाळा दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये सुरुवातीला मान्यवरांची नावे घेताना आदरणीय शरद पवार असे आदराने त्यांचे नाव घेत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी १९७२ मध्ये पवार साहेबांनी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. तेव्हा दुष्काळातून बाहेर काढण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केले. अनेक जणांनी ही शिक्षण संस्था पुढे आणण्याचा प्रयत्न केला.
पाहता पाहता संस्थेचं २२ लाख स्क्वेर फूटचं काम झाल्याचं त्यांनी सांगत दौंडलाही या शाळेची शाखा काढायची आहे. दौंडमध्येही शिक्षणाचं दालन उभं करायचं आहे अशी साहेबांची इच्छा आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. या शिक्षण संस्थेने ५१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या शाळेने कर्तृत्ववान मुलं तयार करण्याचं काम या शिक्षण संस्थेने केलं. आपण विविध सुविधा देण्याचे काम या विद्या प्रतिष्ठानतर्फे करत आहोत. खेळाचे मैदान तसेच विविध खेळांचे प्रकार आणि त्याच्या सुविधा देणार आहोत. या भागात पाण्याची थोडी कमतरता आहे, पण या भागात राहुल कुल आणि दत्ता भरणे आमदार आहेत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकडे लक्ष देतो आहे. संस्थेने २५ कोटी रुपये खर्च आतापर्यंत केलेला आहे. दर्जेदार शिक्षण मिळेल अशी सोय आपण दिली आहे असेही ते म्हणाले.
संस्थेच्या व्याप्तीबाबत त्यांनी बोलताना, अतिशय शून्यातून हे विश्व निर्माण केलं आहे. विद्या प्रतिष्ठानचा देशभर लौकीक वाढला आहे. संस्थेचं विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष असतं. जिद्द आणि चिकाटी ठेवलं तर येथील इमारत पाहून समजू शकतं.
अजितदादांकडून शाळेतील पदाधिकाऱ्यांना विनंती आणि दमही.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेतील स्टाफ ला विनंती आणि दम देताना, स्टाफला सांगतो, शाळेला ‘अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल’ हे नाव दिलं आहे. त्याच्या नावाला साजेसं शिक्षण मिळालं पाहिजे. कोणी कमी पडलं तर गाठ माझ्याशी आहे, इथं येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षण घेतल्यानंतर लाथ मारेल,तिकडं पाणी काढलं पाहिजे, अशी धमक त्यांच्या निर्माण झाली पाहिजे असा मानस बोलून दाखवला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी आपल्याला भाषणातून उपस्थितांना संबोधित करताना १९७२ साली संस्था काढली, सध्या संस्थेत ३२ हजार विद्यार्थी आहेत. त्यातील १५ हजार मुली आहेत. संस्थेचे अनेक वसतिगृह आहेत. शाळेतील मुले जगाच्या पाठीवर जाऊन नाव कमावत आहेत. विदेशात ते अभिमानाने सांगतात की, आम्ही व्हीपीचे विद्यार्थी आहोत. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे सर्व क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. तुमच्या उसामध्ये किती साखर आहे. त्याची तोडणी कधी करायची हे सर्व एआय सांगू शकेल. शेतीवर येणाऱ्या संकटाची माहिती देखील एआयच्या माध्यमातून दिली जाते. अशाप्रकारचा एक विभाग आपण संस्थेमध्ये सुरु केला आहे. मला खात्री आहे की दोन्ही संस्था त्या दृष्टीने काम करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी जागविल्या तात्या साहेबांच्या आठवणी…
शरद पवार यांनी तात्यासाहेबांच्या आठवणी जागविताना तात्यांनी उमेदीच्या काळात मुंबई गाठली आणि व्ही शांताराम यांच्यासोबत काम केलं. पुढे आम्हीच त्यांना कुटुंबाची शेती बघण्यासाठी माघारी बारामतीला बोलावलं. माझ्या पश्चात आप्पासाहेब आणि तात्यासाहेबांनी बारामतीत शेती आणि शिक्षणाची जबाबदारी सांंभाळली. माझ्या निवडणुकीची जबाबदारी देखील तात्यासाहेबांनी व्यवस्थित सांभाळली हे कधीच विसरणार नाही, २६ व्या वर्षी मी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिलो त्यावेळी लढाई सोपी नव्हती. पण तात्या साहेब आणि आप्पा साहेबांनी मला पाठिंबा दिला. त्यांची मदत मी कधीही विसरु शकत नाही असं ते म्हणाले.