‘दादा’ तू लढ म्हणत ‘राहुल कुल’ यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या आईसाहेबांचा वाढदिवस ‘या’ कारणामुळे साधेपणाने साजरा

अब्बास शेख

दौंड : दादा तू लढ, सर्व सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्याचा अण्णांचा वारसा तू पुढे घेऊन जा अशी भूमिका घेऊन कायम आमदार राहुल कुल यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या दौंडच्या माजी आमदार, दौंड तालुक्याचे भाग्यविधाते दिवंगत आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या पत्नी आणि दौंडकर ज्यांना आईसाहेब या नावाने हाक मारतात त्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई सुभाष आण्णा कुल यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

राज्यात पावसामुळे उद्धभवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अनेकजण बेघर झाले आहेत त्यामुळे ताईंनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसाला नागरिकांनी शाल, बुके, हार न आणता त्या बदल्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी आणि त्यांचे पुत्र विद्यमान आमदार राहुल कुल यांनी जनतेला केले होते.

दर वर्षी माजी आमदार रंजनाताई कुल यांचाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र यावेळी राज्यात झालेल्या पावसामुळे अनेकांची घरे, शेती वाहून गेली त्यामुळे माजी आमदार रंजनाताई कुल यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता तसाच निर्णय विद्यमान आमदार राहुल कुल यांनीही घेतला असून आपल्या वाढदिवसाला हार, नारळ, बुके गिफ्ट घेऊन येण्यापेक्षा याची रक्कम पुरात सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन करावी असे आवाहन आमदार राहुल कुल यांनीही केले आहे.