दौंड : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे एका 19 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला 11 ते 12 जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची फिर्याद वेदांत संदीप कदम ( वय 19, रा.पिंपळगाव ता.दौंड, पुणे) याने दिली आहे. वरील फिर्यादिवरून यवत पोलिसांनी आरोपी अशपाक शेख, निखिल थोरात, प्रसाद थोरात, हर्षद थोरात, आदित्य थोरात, सलिम शेख (सर्व राहणार खुटबाव ता.दौंड, पुणे) यांसह 5 ते 6 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वेदांत कदम हा त्याचे मित्र ऋषभ जावळे व सागर प्रकाश रानवडे यांसह गाडीवरून जात असताना त्यांची गाडी अस्पाक शेख याने थांबवुन मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणुन तु मला यापुर्वी फोन वर शिवीगाळ का केली, असे विचारत असताना पाठीमागुन निखील थोरात याने येवुन फिर्यादीच्या कानाखाली चापट मारली, त्यावेळी फिर्यादीने हा गाडीवरून खाली उतरून निखिलला लाथ मारताच तीथे उभा असलेला प्रसाद थोरात व हर्षद थोरात यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहान करण्यास सुरवात केली.
त्यावेळी फिर्यादी खाली पडल्याने तेथे उपस्थित असलेल्या आदित्य थोरात व सलीम शेख यांनीही त्यास लाथाबुक्यांनी मारहान करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे आणखी 5 ते 6 अनोळखी इसमांनी येऊन फिर्यादीला जातीवरून शिवीगाळ करत तुला बघुन घेऊ अशी धमकी दिल्याचे शालेय विद्यार्थ्याने आपल्या फिर्यादित नमूद केले आहे.
या घटनेचा अधिक तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) जाधव हे करीत आहेत.