दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे गेल्या 20 वर्षांपासून माजी आमदार रमेश थोरात यांचे कट्टर समर्थक राहिलेले समृध्द पॅकेजिंग चे अबरार शेख यांनी नुकताच आमदार राहुल कुल गटात प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत शेरू उद्योग समूहाचे इम्रान शेख तसेच यवत येथील मुस्लिम समाजातील तरुण उपस्थित होते.
दौंड तालुक्यात या महिन्यात थोरात गटाला हा सलग दुसरा धक्का असून मागील काही दिवसांपूर्वीच रावणगाव येथील थोरतांच्या कट्टर समर्थकांनी कुल गटात प्रवेश करून थोरात गट आणि राष्ट्रवादीला धक्का दिला होता. कार्यकर्ते का फुटत आहेत आणि त्यांना कोणत्या समस्या भेडसावत हे जाणून घेण्यात राष्ट्रवादी आणि थोरात गट कुठेतरी कमी पडत आहे का याचा विचार आता तालुक्यात काम करणाऱ्या मुख्य नेते मंडळींना करावा लागणार आहे.
आमदार राहुल कुल यांचा तालुक्यात सुरू असलेला विकास कामांचा धडाका आणि ते कार्यकर्त्यांना देत असलेली वागणूक पाहून आपण आपल्या सहकाऱ्यांसह आमदार कुल गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी अबरार शेख यांनी दिली. गटात प्रवेशावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.