Road issue : वाडी-वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यासाठी देऊळगाव गाडा येथील शेतकऱ्यांची आ.कुल यांच्याकडे धाव



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा-नारायण बेट रस्त्यावरून जाचकवस्ती-चौधरीवस्तीयेथे जाणाऱ्या गाड रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने वाडीवस्तीवर जाणारे रस्ते बंद झाले आहेत.  

हे रस्ते खुले करून येथील वाडीवस्तीवरील नागरिक आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील रहिवाश्यांनी आमदार राहुल कुल, ग्रामसेवक आणि तंटामुक्ती अध्यक्षांकडे अर्जाद्वारे केली आहे.

आ.कुल यांच्याकडे आपली व्यथा अर्जाद्वारे मांडताना येथील शेतकऱ्यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून देऊळगाव गाडा येथील जाचकवस्ती-चौधरीवस्ती येथे जुना गाड रस्ता आहे.  मात्र सद्यस्थितीत या रस्त्यावर येथील शेतकऱ्यांनी वहिवाट केल्यामुळे गाड रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. 

त्यामुळे हा रस्ता वापरण्यास मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तीला सर्व्हेनंबर ने अधिकृत रस्ता करण्यात येऊन या रस्त्यावरील अतिक्रमने काढण्यात येऊन हा रस्ता चालू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.