मुंबई
या वर्षाच्या (२०२२-२३) पदविका प्रवेश प्रक्रियेत ३ मुख्य बदल करण्यात आलेले असून यात आता कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे .
तसेच आता कोणत्याही ट्रेडमधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणता १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली आहे.