Big News Sex Racket – बोरीभडक येथील वेश्याव्यवसाय करणारा त्रिमूर्ती लॉज सिल, यवत पोलिसांच्या प्रस्तावावर प्रांताधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब



|सहकारनामा|

दौंड : मौजे चंदनवाडी बोरीभडक तालुका दौंड जिल्हा पुणे या गावच्या हद्दीतील  त्रिमूर्ती लॉजवर अनैतिक व्यापार चालत असून सदर ठिकाणी स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 18 चे उल्लंघन करीत असल्याने नमूद गुन्ह्यातील कुंटनखाण्याचे ठिकाण त्रिमूर्ती लॉजवर कारवाई होणेबाबत यवत पोलीस स्टेशन कडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

त्यावरून प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दौंड पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी त्यांच्याकडील आदेश क्रमांक फौजी कावी 303/ 2021 दिनांक 2/7 /2021 अन्वये त्रिमूर्ती लॉज बोरीभडक या ठिकाणी स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 18 चे उल्लंघन झाल्याने सदर त्रिमूर्ति लॉज सील करणेबाबत आदेश पारित केला आहे.