बारामती : बारामती तालुक्यामध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमधील बॅटरी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलीस आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी बॅटरी चोरीचे गुन्हे घडले असून सदरच्या बॅटरी चोरणारी टोळी ही पणदरे आणि ढाकाळे परिसरात असल्याची खात्री लायक माहिती मिळाली होती. त्यावरून सदर पथकाने संशयित ठिकाणी जाऊन
१) राजेंद्र मारुती जाधव (वय २९)
२) गणेश वामन जाधव (वय ३२)
दोघे रा ढाकाळे तसेच इसम नामे
३) संतोष लक्ष्मण भडलकर (वय ३८)
४) प्रमोद मोहन कोकरे (वय ३८) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता सदरील ४ इसमानी मोरगाव बारामती रोडलगत पार्किंग केलेल्या ट्रक आणि अवजड वाहनाच्या बॅटरी चोरल्या असलेचे सांगितले. सदर बाबत वडगाव निंबाळकर पो स्टे गु र न ४७०/२०२१ भा द वी ३७९ नुसार गुन्हा दाखल आहे. सदरील वरील ४ आरोपी यांनी वरील प्रमाणे अनेक गुन्हे केले असल्याचे सांगितले आहे. सदरील आरोपीना पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई ही मा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते पोलिस उप अधिक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके
पो उप नि शिवाजी ननवरे
सहा फो अनिल काळे
पो हवा रविराज कोकरे
पो हवा अजय घुले
पो हवा विजय कांचन
पो हवा अभिजित एकशिंगे
पो ना स्वप्नील अहिवळे
पो कॉ धिरज जाधव , चा सहा फो काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.