मुंबई : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि एसटी संप यावरूनही जास्त लक्ष हे भाजप, राष्ट्रवादी आणि एनसीबी यांनी वेधल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपण दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या कुटुंबातील कंपनीने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली असल्याचे पुराव्यानिशी समोर मांडले. या आरोपांना नवाब मालिकांनी दोन शब्दांत उत्तर दिले असून ‛आ रहा हु मै’ असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे ड्रग पेडलरसोबत असणारे फोटो नवाब मलिकांनी उघड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपण दिवाळी नंतर धमाका करणार असल्याचे सांगितले होते, त्यावेळी नवाब मलिक यांनीही ‛है तय्यार हम’ असे वाक्य टाकून आपण तयार असल्याचे जाहीर केले होते.
आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आरोप केल्यानंतर आता थोड्याच वेळात नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार असून ते याबाबत काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.