समीर वानखेडे यांची मेहुणी ‛ड्रग्ज’ केसमध्ये.! नवाब मलिक यांच्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी दिले ‛हे’ उत्तर..

मुंबई : समीर वानखेडे यांची मेहुणी आणि क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज केसमध्ये आहे काय.? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. तर यावर माझ्या मेहुणीवर जानेवारी 2008 साली ड्रग्ज प्रकरणी केस झाली असून त्यावेळी मी सर्व्हीसमध्ये जॉईन झालो नव्हतो आणि माझे लग्न क्रांती रेडकर बरोबर 2017 साली झाले आहे असे समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.


राज्यात सध्या आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक हे प्रकरण सध्या खूपच गाजत असून नवाब मलिकांकडून दररोज करण्यात येत असलेल्या नवनवीन खुलाश्यावरून वातावरण चांगलेच तप्त झाले आहे. आर्यन खान याला ड्रग्ज केसमध्ये पकडल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मलिक हे नुसते आरोप करूनच थांबले नाही तर त्यांनी या केसमधील विविध पुरावेच समोर आले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या कारवाई बाबतही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
समीर वानखेडे यांनी आपली मेहुणी ही ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याचे सांगितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच एका वृत्तपात्राला मुलाखत देताना क्रांती रेडकर यांनी समीर आणि ते शालेय मित्र असल्याचे आणि आपली शाळेपासून मैत्री असल्याचे सांगितले होते. त्यामुळे समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या जुन्या ओळखीमुळे पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.