पुणे :
काल पुण्यातील बिबवेवाडी येथे कबड्डी खेळत असलेल्या मुलीवर कोयत्याने वार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आता पुण्यातील नागरिकांसह राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
बारामती लोकसभा विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना ही घटना अतिशय भीषण, निंदनीय आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे, हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर शासन होईल असा विश्वास असल्याचे म्हटले आहे.
बिबवेवाडी येथे अवघ्या 8वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर अतिशय निर्दयपणे कोयत्याने हल्ला करून तिचे शीर धडा वेगळे करण्याचा प्रयत्न हल्लेखोर नराधमाणे केला होता. या हल्ल्यात हि मुलगी जागीच ठार झाली होती. या मुलीवर हल्ला झाला त्यावेळी तिच्या मैत्रिणी आणि वॉकिंगसाठी येणारे लोक भीतीने अक्षरशः सैरावैरा पळत होते. या नराधमा सोबत त्याचे मित्रही असल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी होत आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी या घटनेत मरण पावलेल्या मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.