|सहकारनामा|
बारामती : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा च्या बारामती लोकसभा महिला आघाडी अध्यक्षपदी आफरीन अजिम पानसरे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या वतिने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व प्रवक्ता हाजी एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये आफरीन पानसरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष राजू शेख, शहराध्यक्ष केशव लोखंडे, सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के, अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन शाह, प्रितेश गादिया इ.पदाधिकारी उपस्थित होते.
दौंडचे आमदार राहुल कुल आणि भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा च्या अध्यक्षा कांचनताई कुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी पानसरे यांनी सांगितले.