आज दुपार नंतर दौंड शहरात पुन्हा 2 तर ग्रामीण भागातील केडगाव, यवत, चौफुला, लडकतवाडी, राहू मध्ये 10 जणांना कोरोनाची बाधा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड शहर आणि दौंड ग्रामीणमध्ये कोरोनाचा उपद्रव सुरूच आहे. आत्ता आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार दौंड ग्रामिनमध्ये 10 तर शहरात 2 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

 आज दिवसभरात दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने सेंच्युरी पूर्ण केल्याचे समोर आले आहे.

ताज्या प्राप्त अहवालानुसार यवत 2, केडगाव 1, चौफुला 1, लडकतवाडी 1,आणि राहू 5 अशी आकडेवारी समोर आली आहे तर शहरामध्ये 2 व्यक्तींचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शेंडेवस्ती 1, आणि भवानी नगर 1 अशी आकडेवारी समोर आली आहे.

दौंड तालुक्यामध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कोरोनाने अचानक उसळी घेतल्याचे समोर आले आहे, दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रादुर्भाववामुळे दौंडकरांची अवस्था बिकट बनत चालली आहे.