वालचंदनगर येथे 3 लाखाचा गांजा जप्त



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दि. 19/09/2020 रोजी बारामती विभागात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विश्वासातील बातमीदारकडुन बातमी मिळाली की, देहूरोड पोलीस ठाणे कडील दाखल NDPS गुन्ह्यातील अटक आरोपी नितीन झेंडे याचा भाऊ शुभम झेंडे याने त्याचा मित्र आनंद गजघाटे रा.पाटील वस्ती वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे याचे  घरांमध्ये गांजा नावाचा अमली पदार्थाचा साठा ठेवलेलाआहे.

हि माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ सह जाऊन  छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी सुमारे दोन किलो वजनाचे खाकी रंगाचे १३ पुडे, त्याची एकूण किंमत अंदाजे 3,10,000 रुपये किंमत असलेला गांजा जप्त केला असून पुढील कारवाई कामी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

 सदरची कारवाई ही मा.श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,

मा. श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग बारामती, यांच्या आदेशान्वये मा. श्री पद्माकर घनवट सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक  स्थानीक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली

सपोनि/ दिलीप पवार वालचंदनगर, 

पोसई/अमोल गोरे स्था.गु. शाखा, पोहवा ज्ञानेश्वर क्षिरसागर, पोना/ गुरु गायकवाड, पोना/सुभाष राऊत, पोहवा/काशिनाथ राजापुरे, सर्व नेमणूक स्थागुशा, पोसई जगताप, पोहवा/सातव, पोवा/ शिंदे, पोशि/कळसाईत, मपोशि/जामदार, वालचंदनगर पोलिस स्टेशन यांचे पथकाने केलेली आहे.