दौंड : दौंड शहरातील एका इसमास दौंड रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या खडीवर तो निवांत बसला असताना त्यास 3 अज्ञात इसमांनी लुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या इसमाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महेंद्र नारायण खरात (रा.भोईटेनगर, दौंड) हे रात्री 8 वाजता दौंड रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड शेजारी दौंड-सोलापुरकडे जाणारे रेल्वे ट्रॅक जवळ खडीचे ढिगाऱ्यांवर बसले असताना त्या ठिकाणी तीन अज्ञात इसम आले व त्यातील दोघांनी खरात यांच्या डोक्यात काठी सारख्या वस्तुने प्रहार करून तिघांनी लाथबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी या आरोपींनी खरात यांच्या खिशातील रोख रक्कम, रु. सॅमसंग कंपनीचा 3 हजार रु.मोबाईल व 30 हजार रुपयांची एच एफ डिलक्स मोटार सायकल क्र. एम.एच ४२ ए. डब्यु ७१४५ हे जबरदस्तीने फिर्यादी यांच्याकडून हिसकावुन घेवुन गेले.
हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी यांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई आबनावे हे करीत आहेत.