CRIME – ‛आत्महत्या’ केलेल्या महिलेवर 2 मुलांची हत्या केल्याप्रकरणी ‛खुनाचा’ गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

यवत (ता.दौंड) येथे कॅनॉलमध्ये एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. या महिलेने कोणत्यातरी कारणावरून स्वतः आत्महत्या करून स्वतःच्या दोन मुलांचीही स्वतःबरोबर पाण्यात उडी घेऊन हत्या केली होती. या प्रकरणी आता या मृत महिलेवर दोन मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी 

फिर्याद दिली असून आरोपी मयत अनिता

लक्षदीप वांजळे हिच्यावर दोन्ही मुलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. २०/०२/२०२० रोजी यवत येथे ०५:४५ वाजता मयत अनिता लक्षदीप वांजळे हिने स्वत:हा आत्महत्या करण्यासाठी कॅनॉलच्या पाण्यात उडी मारत असताना तिने स्वत:च्या दोन लहान मुलांना कॅनॉलच्या पाण्यात बुडुन ठार मारण्याच्या उददेशाने तिचे सोबत घेवुन पाण्यात उडी मारुन त्यांना ठार मारुन आत्महत्या केली होती.

या घटनेमध्ये ती महिला व तिची दोन्ही मुले मयत झालेली होती. या घटनेचा तपास सहा. धनंजय कापरे यांनी केला असून त्यांनी सरकार बाजूने सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.