दौंडमध्ये 11 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाइन 

दौंड शहरामध्ये आज दिनांक 20/11/2020 रोजी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली.

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 304 जणांचीरॅपिड अँटीजेन  तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 11 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 293 व्यक्ती चे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 2 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश असून दौंड शहर 4, ग्रामीण 1 तर एसआरपीएफ गट नं (7) मध्ये 6 जण असे 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांचे वयोगट 12 वर्ष ते 68 वर्ष असे आहेत.