दौंडमध्ये पाठलाग करून दरोड्यातील आरोपी जेरबंद, 2 वर्षांपासून होता फरार



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

एका दरोडयाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात LCB पथकाला यश आले आहे. हा आरोपी २ वर्षापासून फरार फरार होता. 

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने रेकॉर्डवरील वॉन्टेड फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवित असताना दिनांक २०/११/२०२० रोजी दौंड पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. २२२/२०१८ मधील दरोड्याच्या गुन्हयातील दोन वर्षापासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी माऊली बंटया भोसले (वय २१ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे) हा दौंड नगर मोरी चौक येथे येणार असल्याची बातमी LCB टीमला मिळाली होती. 

या माहितीवरून सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपीवर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथेही एक गंभीर गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन  त्यास दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या  मार्गदर्शनाखाली सपोनि. पृथ्वीराज ताटे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा.निलेश कदम, पोहवा.सचिन गायकवाड, पोना. गुरू गायकवाड, पोना. सुभाष राऊत यांनी केलेली आहे.