Crime : भांडगावमधून चोरट्यांनी बोलेरो पळवली, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील भांडगाव येथून चोरट्यांनी महिंद्रा बोलेरो जीप चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  दि. १३/१२/२०२० रोजी सकाळी ०६:०० वा सुमारास जीपचे मालक फिर्यादी किसन दोरगे हे झोपेतुन उठुन रूमचे बाहेर आलो असता त्यांना त्यांची बोलेरो गाडी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी गाडीचा आजुबाजुस शोध घेतला असता त्यांची गाडी कुठेही आढळून आली नाही. तेव्हा त्यांची खात्री

झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची महिद्रा कंपनीची शॉर्ट बोलेरो गाडी नं.एम.एच.४२/एच/०७४१ ही चोरून नेली आहे. ही गाडी पुणे सोलापुर 

हायवेच्या बाजूला असलेल्या खुटबावकडे जाणारे रोडलगत असणारे संस्कृती वजन काटा येथून चोरी करण्यात आली आहे.

याबाबत किसन दोरगे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.