पेट्रोल पंपातील 4 लाखाची रक्कम घेऊन कर्मचारी झाला पसार, भांडगावच्या पेट्रोल पंपावरील घटना



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम घेऊन पोबारा केला असल्याची गंभीर घटना घडली आहे.

याबाबत पेट्रोल पंप मॅनेजर फिरोज गफूर पठाण याने फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपी दिलीप बळीराम नाईकनवरे याच्यावर पेट्रोल पंपातील रक्कम चोरून घेऊन गेल्याप्रकर्णी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी याने भांडगाव (ता. दौंड जि पुणे) या गावाच्या हददीत असणाऱ्या यशोदा पेट्रोलियम येथे ता ११/१२/२०२० रोजी ते ता १२/१२/२०२० रोजी दरम्यान दोन दिवस डिझेल विक्रीतून मिळालेली रोख रक्कम ४,०२,२७०रू /- (चार

लाख दोन हजार दोनशे सत्तर रूपये) फिर्यादी यांच्या संमती शिवाय चोरी करून चोरून घेवुन गेला आहे. 

या आरोपीचा विविध ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे अखेर पंपचालकांनी त्याची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात दिली असून यवत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.