Murder : पुणे शहरात भरदिवसा ‛सत्या’ स्टाईलने ‛खून’, एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी



पुणे : सहकारनामा

वीस वर्षांपूर्वी मुंबईतील टोळी युद्धावर आधारित ‛सत्या’ चित्रपटामध्ये जसा भरदिवसा गुरू नारायण या पात्राचा शहरात सत्या  लोकांसमोर खून करतो तसाच काहीसा थरार आज पुणेकरांनी पुणे शहरात आजमावला आहे. 

आज पुणे शहरात क्षुल्लक कारणावरून एकाने रस्त्यावरच धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला चढवत एकाला जागीत गतप्राण केले तर यात दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर सकाळी 11 वाजता हा सर्व भयानक प्रकार घडला आहे. रस्त्यावर हा थरार उडाला आहे.

या घटनेमध्ये सलीम मेहबूब शेख हा 24 वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे तर तोहफिक शेख हा  27 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

हा खून आणि खुनी हल्ला केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अनिल कचरावत या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना आज शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या तिघांमध्ये किरकोळ वाद झोला होता. यावेळी आरोपीने लोखंडी कोयत्यासारख्या हत्याराने या दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. 

हा प्रकार सुरू होताच नागरिकांमध्ये एकच धावपळ होऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात सलीम शेख हा जागीच ठार झाला तर तोहफिक शेख  हा वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी झाला.

त्यास नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपी अनिल यास जेरबंद केले आहे.