औरंगाबाद : सहकारनामा
राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत औरंगाबाद शहरात राहणाऱ्या एक 29 वर्षीय तरुणीने त्याबाबत फिर्याद दिली आहे.
सदर तरुणी हि बायजीपुरा येथे राहत असून ती खाजगी शिकवणी क्लास घेते. या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने दि.14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत तिला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी जवळ बोलावले होते. हि तरुणी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेल रामगिरी समोर पोहोचल्यानंतर मेहबूब शेख हा कार घेऊन तेथे उभा होता.
त्यानंतर हि कार वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्जन स्थळी थांबउन या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांना या दाखल गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी याबाबत बोलताना बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अन्य कोणी मेहबूब इब्राहिम शेख नावाचा व्यक्ती नाही आणि कोणी असेल तर पोलिसांना शोध घ्यावा पण सदरील जी फिर्यादि महिला सांगितली जातेय त्या महिलेस मी कधीही भेटलो नाही आणि 10,11 तारखेला मी मुंबईत होतो तर 17 तारखेला मी माझ्या मूळ गावी होतो असं त्यांनी म्हटलं आहे.
आरोप करणारी सदर तरुणी हि उच्च शिक्षित असून ती घरगुती शिकवणीचे क्लास घेत असल्याचे सांगितले जात असून त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी क्लास सुरू करायचे होते त्यामुळे ती तरुणी बायपास परिसरात खोली भाड्याने घेण्यासाठी गेली होती त्यावेळी तिची बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील मेहबूब इब्राहिम शेख यांच्याशी भेट झाली.
त्यांनंतर तिची संपूर्ण माहिती घेऊन तुला मुंबईत नोकरी लावून देतो असे आमिष महेबूब शेख यांनी दाखवले व तिच्यावर अत्याचार केले असे तिचे म्हणणे असून याबाबत तू कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असा दम देऊन तिला कारमधून उतरून दिल्याचे तिचे म्हणणे आहे.
याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.