Crime – तरडे (लोणीकाळभोर) जवळ तरुणीचा मृतदेह आढळला, लोणीकाळभोर पोलीसांनी केले आवाहन



लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

हवेली तालुक्यातील तरडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बनकर मळा येथे नवीन उजवा कालव्यात २० ते २५  वर्षीय तरुणीचा मृतदेह आज बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.

या तरुणीच्या अंगावर मेहंदी रंगाचे जर्किंग, पांढऱ्या व काळ्या रंगाचा टॉप तसेच काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उजव्या हातात निळ्या रंगाचे मनगटी घड्याळ असून डोक्यावरील केस हे वेडेवाकडे कापलेले आहेत. पँटच्या उजव्या खिशात २८७ नंबर असलेली चावी आढळली आहे.

या तरुणीबाबत काही माहिती असल्यास लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी (०२०- २६९१३२६०) या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन लोणीकाळभोर पोलिसांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सचिन पवार करीत आहेत.