दौंडमध्ये झालेल्या खून प्रकरणी 12 जणांना जन्मठेप, शिक्षा झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 4 सख्ख्या भावांचा समावेश

बारामती : दौंड येथे झालेल्या खून प्रकरणात बारामती सेशन कोर्टने दौंड येथील 1 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये चार सख्ख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे. विनोद नरवाल आणि त्यांची पत्नी मीना नरवाल हे देवदर्शन करून परत येत असताना विनोद नरवाल यांच्यावर तलवार, लोखंडी पाईप, काठ्या आणि दगडाने हल्ला करण्यात आला होता. यात विनोद नरवाल यांचा मृत्यू झाला होता.

विनोद नरवाल यांच्या खून प्रकरणी बारामती सेशन कोर्टने 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून शिक्षा झालेल्यांमध्ये 1) संजीत जयप्रकाश टाक (वय 45 वर्षे रा. पासलकर वस्ती लिंगाळी कोर्टाजवळ तालुका दौंड जिल्हा पुणे) 2) सुजित जयप्रकाश टाक (वय 43 वर्ष रा. पासलकर वस्ती लिंगाळी रोड कोर्टा जवळ ता. दौंड जि. पुणे) 3) रवी जयप्रकाश टाक (वय 34 वर्षे रा. पासलकर वस्ती लिंगाळी कोर्टाजवळ तालुका दौंड जिल्हा पुणे) 4) रणजीत जयप्रकाश टाक (वय 37 वर्ष रा. वाल्मिकी नगर दौंड ता. दौंड जि. पुणे) या चार भावांसह 5) आकाश उर्फ छोटू दीपक बहोत (वय 35 वर्षे रा.दौंड रेल्वे पावर हाऊस वाल्मिकी नगर तालुका दौंड जिल्हा पुणे) 6) नरेश प्रकाश वाल्मिकी (वय 35 वर्ष रा. वाल्मिकी नगर दौंड ता. दौंड जिल्हा पुणे) 7) बबलू हिरालाल सारवान (वय 38 वर्ष रा. वाल्मिकी नगर दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) 8) सुरेश हिरालाल सारवान (वय 38 वर्ष रा. वाल्मिकी नगर दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) 9) मयुरी संजीत टाक (वय 40 वर्ष रा.वाल्मिकी नगर दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) 10) माधुरी सुजित टाक (वय 40 वर्षे रा. वाल्मिकी नगर दौंड ता. दौंड जिल्हा पुणे) 11) शोभा किशोर वाल्मिकी (वय 48 वर्षे रा. वाल्मिकी नगर दौंड ता. दौंड जिल्हा पुणे) 12) विकी नरेश वाल्मिकी (वय 36 वर्ष रा. वाल्मिकी नगर दौंड ता. दौंड जि. पुणे) या बारा जणांचा समावेश आहे.

असा झाला खून दिनांक 3 मे 2018 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दौंड येथील पासलकर वस्ती, दौंड कोर्टाजवळ ही घटना घडली होती. यातील मयत विनोद नरवाल आणि त्यांची पत्नी मीना नरवाल हे गणपतीचे दर्शन करून टू व्हीलर वरून घरी परत येत होते. यावेळी वरील 12 आरोपींनी त्यांना रस्त्यामध्ये अडवत त्यांच्याजवळील तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठ्या आणि दगडांनी विनोद नरवाल यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मीना नरवाल यांनी आपल्या पतीला पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणि तेथील प्रत्यक्षदर्शीला सुद्धा मारहाण झाली होती. या हल्ल्यानंतर विनोद नरवाल यांना उपचारासाठी पुण्याला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणी मीना नरवाल यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. यामध्ये दौंड पोलिसांनी बारामती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासमोर खटला चालला. सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी 8 साक्षीदारांचे पुरावे सादर केले. वरील पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने 12 आरोपींना खुनाच्या आरोपाखाली (भा.द.वि. कलम 302) जन्मठेप आणि विविध कलमांमध्ये अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यातदौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, फिर्यादीचे वकील ॲड. मंगेश देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, जी. के. कस्पटे आणि दौंड पोलीस स्टेशनच्या म.पो.ह. मनिषा अहिवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.