Big News : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग



पुणे : सहकारनामा

पुण्यातील सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीला भीषण आग लागली असून ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटला आग  लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हि आग इन्स्टीट्यूटच्या नव्या इमारतीला लागली आहे.

पुणे जवळ मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवार दि.21 जानेवारी रोजी  दुपारच्या सुमारास लागली आहे. या आगीचे आणि त्यापासून तयार झालेल्या धुराचे लोट सर्वत्र दिसत होते. 

सध्या कोरोनावरील  ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत असून या लसीमुळे भारताकडे संपूर्ण जग आशेच्या नजरेने पाहत आहे.