Big News : धनंजय मुंडे-रेणू शर्मा कहाणीत ट्विस्ट! रेणू शर्माकडून बलात्काराची तक्रार मागे!



मुंबई : सहकारनामा

राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून या प्रकरणात रेणू शर्मा हिने बलात्काराची तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रेणू शर्मा हि एक गायक असून तिने धनंजय मुंडेंवर यांच्यावर बलात्काराची तक्रारा केल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. तर या प्रकरणामुळे भाजपकडून मुंडेंचा राजीनामा मागितला होता तर या प्रकरणातील प्रश्नांची उत्तरे देताना मुंडेंना नाकीनऊ आले होते. 

आता मात्र तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे घेतली असल्याचे तिच्या लेखी अर्जावरून समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार  रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. मात्र पोलिसांनी तिला तिचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला आहे. असे एका अग्रगण्य वृत्तपत्राने लिहिले आहे.